ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज.

प्रकाशन: 22 Jul 2022 05:22 PM
वाचन संख्या 44

योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई | ब्यूरो न्यूज : नवे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आता सुरु होत असून राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मिडीया, चित्रपट निर्मितीशी संबंधीत विविध व्यावसायीक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १६ ते ३२ वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपयांपेक्षा कमी असावी. राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून यामधून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १८ ते ३२ वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत. दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त ३ टक्के इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील ५ वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा ०२२-२२६५७९८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स