<em>कोळेकर कुटुंबियांना आमदार वैभव नाईकांची सांत्वन भेट…!</em>
मालवण | प्रतिनिधी :
माजी पंचायत समिती सभापती राजन जाधव यांच्या मातोश्रीचे निधन झाले,तर कालेली ग्रा.प. सदस्य दिनेश परब यांचे बंधू राजेंद्र परब यांचे निधन झाले,कालेली येथील वासुदेव जोशी यांचे निधन झाले. तसेच महादेवाचे केरवडे येथील विठ्ठल कोळेकर यांचे निधन व हायवे अपघातात पावशी येथील संदीप जाधव यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देऊन कुटुंबियांची विचारपूस करत सांत्वन केले. याप्रसंगी कुडाळ शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, सागर भोगटे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)