ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे गरजू मुलींना मोफत सायकल वाटप व गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे गरजू मुलींना मोफत सायकल वाटप व गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न.</em>

प्रकाशन: 14 Jul 2022 11:34 AM
वाचन संख्या 56

बांदा | राकेश परब :
रोटरी क्लब नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रात बांदा गावात उपक्रम राबवत आहेत. बांदा पंचक्रोशीतील गावातील लोकांना या उपक्रमाचा मोठा फायदा व्हावा म्हणून योग्य नियोजन रोटरी क्लब बांदा कडून करण्यात येत आहे. अशाच सामाजिक उपक्रमातून रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे गरजू मुलींना मोफत सायकल वाटप व गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ बांदा तर्फे नुकतेच आनंदी मंगल कार्यालय बांदा येथे गरजू होतकरू मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने या कार्यक्रमात दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरूंचा सत्कारही करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.शामराव काळे, बँक ऑफ इंडिया बांदाचे शाखाप्रबंधक अंकित धवन, जी एस आर रो.आनंद रासम असिस्टंट गव्हर्नर रोटरियन नीता गोवेकर, सावंतवाडी रोटरी क्लबचे सेक्रेटरी रो. प्रमोद भागवत बांदा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रो.मंदारजी कल्याणकर व्हाईस प्रेसिडेंट रो.प्रमोदजी कामत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद भिडे यांनी केले व या कार्यक्रमाचे इव्हेंट चेअरमन तुषार धामापुरकर हे होते. प्रास्तविक प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांनी केले यामध्ये बांदा रोटरी चा अहवाल व भविष्यातील होणारे प्रकल्प याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. डीजी गौरीश धोंड व फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड यांच्या संकल्पनेतून गर्ल्स पेडल पावर या प्रोजेक्ट मधून या सायकली मुलींना देण्यात आल्या. बांदा रोटरी मधून दहा सायकलचे वाटप करण्यात आले यावेळी नीता गोवेकर, आनंद रासम यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक काळेसाहेब व अंकित धवन यांनी आपले विचार मांडले. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने श्री.गणेश गर्दे सर व ज्येष्ठ मूर्तिकार सुरेश गुळेकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बांदा रोटरीचे सेक्रेटरी फिरोज खान, खजिनदार बाबा काणेकर सुदन केसरकर, सुधीर शिरसाठ, प्रवीण शिरसाठ सिद्धेश पावसकर, आबा धारगळकर, स्वप्निल धामापूरकर ,पिंटू गायतोंडे मनसुख वासानी, डॉक्टर जगदीश पाटील, सचिन मुळीक, स्वागत नाटेकर, संदीप देसाई, शितल राऊळ, दिलीप कोरगावकर, सुनील राऊळ ,संजय शिरोडकर रत्नाकर आगलावे ,शिवानंद भिडे ,योगेश परुळेकर ,श्वेता कोरगावकर इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार फिरोज खान यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स