उद्या 11 जुलैला 'भाजप भटके विमुक्त आघाडी' जिल्हाध्यक्ष नवलराज काळे मालवण दौऱ्यावर.
भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी 10.30 वाजता मालवण भाजप कार्यालय येथे उपस्थित राहायचे तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांचे आवाहन
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा पदाधिकारी यांच्या समवेत 11 जुलै रोजी मालवण दौऱ्यावर येत आहेत. भाजप नेते माजी खासदार डाँ. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता, पदाधिकारी भेटीगाठी, संवाद बैठक, व संघटनात्मक निवडी बाबत मालवण तालुक्यातील दौरा आयोजित केला आहे, मालवण तालुका भाजप कार्यालय येथे 10.30 वाजता त्यांचे आगमन होणार असून तालुक्यातील भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी 10.30 वाजता मालवण भाजप कार्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष श्री बाळा गोसावी यांनी केले आहे. तेथून पुढे माजी खासदार डाँ.निलेश राणे यांच्या नियोजित दौऱ्यात काळे भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा पदाधिकारी यांच्या समवेत सामील होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)