मनसे पदाधिकारी अमित इब्रामपूरकर यांनी घेतली अमित ठाकरे यांची सावंतवाडीत भेट.
उद्या अमित ठाकरे मालवणमध्ये ; मनसे कार्यकर्त्यांमध्ये संचारलाय उत्साह.
मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट अमित इब्रामपूरकर यांनी आज सावंतवाडी येथे घेतली.यावेळी मनसे सरचिटणीस जीजी उपरकर,मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर उपस्थित होते.
महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी दौरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा.अमितसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून आज सावंतवाडी येथे हॉटेल मँगो येथे सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी यांची संवाद बैठक आज घेतली. तर उद्या बुधवारी सकाळी १०.३० वाजता मराठा समाज हॉल येथे कुडाळ-मालवण येथील आणि दुपारी ०२.३० वाजता कणकवली-वैभववाडी-देवगड तालुका येथील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांच्याशी संवाद बैठक होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)