भाजपा युवा नेते निलेश राणे यांची ११ जुलैला मालवण नगरपालिकेला भेट…!
मालवणच्या जनतेच्या समस्या व प्रश्नांची घेतलीय विशेष दखल…!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरामध्ये सध्या पावसाचे पाणी साचून मालवणमधील विविध दैनंदिन जीवनातील प्रमुख विभाग व रस्ते जलमय झाले आहेत. नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन फक्त कामाचा दिखाऊपणा यामुळेच देऊळवाडा पुल ,एसटी स्टँड ,बाजारपेठ ,मेढा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते .शहरात आपत्कालीन परिस्थिती असताना मुख्याधिकारी शहराच्या बाहेर होते .त्यांना फोन लावून विचारणा केली असता त्यांनी कामगार कपात आहे ,ठेकेदार काम करत नाही अशी उत्तरे देऊन त्यांची प्रशासकीय जबाबदारी झटकण्याचे काम ते वेळोवेळी करत आहेत असा आरोप सध्या मालवण भाजपातर्फे करण्यात येत आहे.
तक्रार करण्यासाठी दिलेला कर्मचाऱ्याचा फोन नंबर स्विच ऑफ लागतो व नगरपालिकेत प्रत्यक्ष प्रशासनाला विचारणा केली असता कोणतेही समाधानकारक व ठोस उत्तर कोणी देत नाही तरिही नालेसफाई व गटार सफाई करणाऱ्या ठेकेदाराचे बिल काढून प्रशासन मोकळे झाले आहे . कोणत्याही प्रकारचे कामाची शहानिशा न करता काढलेली बिले ही टक्केवारीच्या संशयाच्या भोवऱ्यातच आहेत.
पावसाळ्याच्या आधीच भाजपाने नालेसफाई व गटार सफाई संदर्भात नगरपालिकेचे लक्ष वेधले होते .त्याच अनुसरून आमदार वैभव नाईक यांनी आढावा बैठक घेऊन मुख्याधिकाऱ्यांना लवकरात लवकर साफ सफाई करण्याचे निर्देश दिले होते .हे निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी न पाळता केराची टोपली दाखवली आहे .यावरूनच प्रशासनावर आमदारांचा वचक दिसत नाही असा निष्कर्ष भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काढला आहे .
आधी सत्ताधारी असणारे व आता विरोधात असणारे लोकप्रतिनिधी मुख्याधिकाऱ्यांची बाजू घेऊन मुख्याधिकारीच कार्यसम्राट आहेत याची प्रसिद्धीमार्फ जनतेला प्रचिती देत होते .कोणतीही टीका केली तरी शिवसेनेचे माजी नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांची कायम तळी उचलून धरता होते .हेच तळी उचलणारे लोकप्रतिनिधी पाणी साठल्याबरोबर मुख्याधिकारी कसे काम चुकार आहेत हे दाखवण्यासाठी फोटोसेशन करताना दिसत आहेत .भाजपा जनतेसमोर स्पष्टता मांडत असताना जनतेचे विषय घेऊन भांडत असताना विकासाला खीळ घालतात असे शिवसेनेच्या पदाधिकारी कायम टीका करत होते .आता तेच शिवसेना पदाधिकारी व नेते मुख्याधिकाऱ्यांवर टीका करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम व नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करत आहेत व आपण कसे स्वच्छ होत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत असा आरोप मालवण भाजपाच्यावतीने करण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मालवणच्या जनतेचे प्रश्न घेऊन सोमवार दिनांक 11 जुलै 2022 रोजी सकाळी ११.००वाजता मालवण नगरपालिकेला भाजपा युवा नेते व माजी खासदार डाॅ. निलेश राणे स्वतः भेट घेऊन या संदर्भातील मालवणच्या जनतेचे असणारे प्रश्न मांडणार आहेत.
भाजपाचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष
सुदेश आचरेकर या प्रमुख पदाधिकार्यांनी अशी माहिती दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)