ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>बॅ.नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे 'आषाढस्य प्रथम दिवसे ' कार्यक्रम संपन्न…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>बॅ.नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर मालवण येथे 'आषाढस्य प्रथम दिवसे ' कार्यक्रम संपन्न…!</em>

प्रकाशन: 04 Jul 2022 10:17 PM
वाचन संख्या 116

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
बॅ .नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरच्यावतीने ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अ.शि.देसाई टोपीवाला हायस्कूल येथे मराठी आणि संस्कृत या विषयांचे अध्यापन करत असलेले मा. श्री. महेश धामापूरकर यांचे महाकवी कालिदास यांच्यावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात साने गुरूजी यांच्या प्रतिमेला मा. महेश धामापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी साने गुरुजी यांची “खरा धर्म ही प्रार्थना” सौ.वैष्णवी आचरेकर, सौ.सोनाली कोळंबकर, सौ. पंढरी सावंत यांनी सुरेल आवाजात सादर केली. संस्थेच्या वतीने कार्यवाह मा. लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन मा. श्री. महेश धामापूरकर यांचे स्वागत करण्यात आले. सौ.ज्योती तोरसकर यांना संस्थेचे कोषाध्यक्ष मा.श्री. रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली.
कार्यक्रमासाठी अ.शि.देसाई टोपीवाला हायस्कूल मधील इयत्ता ९वी ‘अ ‘ चा वर्ग उपस्थित होता. मा. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सेवांगण संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.
कवि कालिदासांचे जीवन चरित्र आपल्या ओघवत्या शैलीत महेश धामापूरकर यांनी उलगडले. संस्कृत आणि मराठी या भाषांचा सुयोग्य समन्वय साधून कालिदास सर्वांच्या ह्रदयात उतरवला.सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांना पाच प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली . सर्वोत्कृष्ट प्रश्नाची निवड मा.ज्योती तोरसकर यांनी केली. कु.आर्यन प्रभूगांवकर याच्या सर्वोत्कृष्ट प्रश्नाची निवड करण्यात आली आणि त्याला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे महेश धामापूरकर यांनी दिली.
यावेळी मुलांना साधना दिवाळी अंक भेट देण्यात आला याच अंकावर जुलै महिन्याच्या अखेरीला स्पर्धा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
साने गुरुजी वाचन मंदिर च्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी ग्रंथालयाची माहिती मुलांना दिली तसेच वाचनालयाचे वाचक सभासद होण्याचे आवाहन केले. विद्यार्थी ग्रंथालयात येवून वाचनासाठी वेळ देऊ शकत नसतील तर वर्गातील मुलां इतकी पुस्तके शाळेत नेऊन देण्याची तयारी दर्शविली.मा. ज्योती तोरसकर आणि मा.महेश धामापूरकर यांनी ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला सौ स्नेहा साटलकर, श्री. संजय आचरेकर, सौ. रुचिरा चिंदरकर, अक्षय सातार्डेकर, मा. चारुशीला देऊलकर श्री. मनोजकुमार गिरकर, श्री. विजय कुडाळकर, कु. अदिती कुडाळकर, श्री.धर्माजी कांबळी, श्री.भालचंद्र मळेकर, श्री बागवे, सौ. कदम, सौ. पूनम भुर्के, श्रीम.तेजस्विनी पाताडे उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था श्री. संजयकुमार रोगे आणि सौ. सोनाली कांबळी यांनी पाहिली. आभार श्री. संजयकुमार रोगे यांनी मानले.
कार्यक्रमाचा समारोप संस्थेच्या वतीने सर्वांना अल्पोपहार आणि चहा देऊन करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स