नारायण राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी… : खास. विनायक राऊत
“ती” वाघाची नाही तर कोल्ह्याची गुहा असल्याचा आरोप…
ब्युरो न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून अवघ्या महाराष्ट्राचा अपमान करणा-या नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी,अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. दरम्यान राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आता शिवसैनिक निषेध करतील.आणि येणाऱ्या निवडणूक त्यांना नक्कीच पाणी पाजतील असाही इशारा त्यांनी दिला आहे.श्री राणे यांनी केलेल्या विधानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार नितेश राणे यांनी वाघाची गुहा असा उल्लेख केला होता. परंतु वाघाची नाही तर ती कोल्ह्याची गुहा आहे. असाही पलटवार श्री. राऊत यांनी केला आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)