ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मडुरा गावातील वीज समस्या बाबतचे ग्रामस्थांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित.

मडुरा गावातील वीज समस्या बाबतचे ग्रामस्थांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित.

प्रकाशन: 04 Jul 2022 10:01 AM
वाचन संख्या 42

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात वीज समस्यांचा डोंगर उभा राहिला असून याकडे वायरमन, लाईनमन, बांदा अधिकारी तसेच सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. अपघात होऊन विद्युत वाहिनी तुटल्याची कल्पना दिल्यानंतरही कर्मचारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित राहत नसल्यामुळे हानी झाल्यास जबाबदार कोण व मागणी करूनही कामे रेंगाळलेली असतात, वीज अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल करत उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र उपस्थित केलेल्या सर्व मागण्या दहा दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत माधव यांनी सांगितले.


उपोषणास उपस्थित सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, सातोसे सरपंच बबन सातोस्कर, माजी सरपंच आबा धुरी, माजी उपसरपंच उल्हास परब, ग्रा.पं.माजी सदस्य प्रकाश वालावलकर, तसेच तातो शेर्लेकर, नितीन नाईक, प्रकाश सातार्डेकर, बाळू गावडे, दाजी सातार्डेकर, संतोष जाधव, पिंट्या परब, मोहन गवस, दिनेश नाईक, सुधीर नाईक,साहिल माधव, तेजा शिरोडकर, संतोष परब, रामा परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावात सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. कास मंगळमोड जंगल भागातून जाणाऱ्या मेन लाइनवर झुडपे वाढलेली आहेत. सातार्डातून पर्यायी वीजपुरवठा तसेच रोणापाल ते माऊली मंदिर दरम्यान मेन लाईन जोडणी कामात आम्हाला केवळ तोंडी आश्वासने दिली जातात व त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे सांगत तात्या माधव आक्रमक झाले.
नैसर्गिक आपत्तीत आम्ही ग्रामस्थ वीज वितरणला कायम सहकार्य करत असतो. डिगवाडीतील विद्युत वाहिनीवर पूर्णपणे झाडी आहे. भरमसाट आलेली वीज बिले आम्ही नेहमी वेळेवर भरतो मात्र ग्राहकांना उद्भवणाऱ्या समस्यांकडे उपकार्यकारी अभियंता यांचाच लक्ष नसल्याचा आरोप ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश वालावलकर यांनी केला.
उपसरपंच विजय वालावलकर म्हणाले की, तिठ्यावर लाइनमन यांना एक कार्यालय उघडून द्या. कारण वीज समस्यांसंदर्भात लाईनमन कधीही गावात फिरत नसल्याचे ते म्हणाले.
सातोसेत वीज अपघात होऊन मनुष्य हानी झाल्यास जबाबदार कोण असा सवाल सातोसे सरपंच बबन सातोस्कर यांनी केला.
दरम्यान, सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता श्री. घुरे व बांदा सहायक अभियंता अनिल यादव यांनी वीज संदर्भात ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी बांदा पोलीस तैनात करण्यात आले होते. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, उपकेंद्राच्या डॉ. माजगावकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शेकडो ग्रामस्थांनी उपोषणाला पाठिंबा दर्शविला होता.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स