चिंदरचे गावचे सुपुत्र आत्माराम नाटेकर यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी वर निवड…..!
चिंदर/विवेक परब :
मालवण तालुक्यातील चिंदर गावचे सुपुत्र आत्माराम नाटेकर(सध्या रा. मुंबई) यांची मुंबई मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या निवडणूकीत कार्यकारिणीवर बहुमताने निवड झाली आहे. गेली 33 वर्षे लोकसत्ता मध्ये कार्यरत असलेल्या नाटेकर यांची हि निवड पाचव्यांदा झालेली आहे.
लोकसेवा समिती डोंबिवलीचे माजी अध्यक्ष असलेले नाटेकर हे सामाजिक, साहित्य क्षेत्रात नेहमी कार्यरत असतात. त्यांच्या या निवडी बद्दल मुंबई मराठी पत्रकार संघ, ग्रामवासिय, सदिच्छक यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)