ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मृत कंत्राटी कर्मचारी मिराशीच्या कुटुंबाला मिळाला मदतीचा हात ; लाखो रुपयांच्या मदतीचे धनादेश  मिराशी कुटुंबाकडे सुपूर्द.

मृत कंत्राटी कर्मचारी मिराशीच्या कुटुंबाला मिळाला मदतीचा हात ; लाखो रुपयांच्या मदतीचे धनादेश  मिराशी कुटुंबाकडे सुपूर्द.

प्रकाशन: 29 Jun 2022 04:46 PM
वाचन संख्या 99

चिंदर / विवेक परब :
वीज पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी आपले कर्तव्य चोख बजावत असताना, आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आनंद मिराशी या  कंत्राटी कर्मचाऱ्याला अखेर कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मिठबांव सरपंच भाई नरे आणि संदीप साटम यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देत सबंधित ठेकेदाराकडून भरघोस अशी मदत मिळवून दिली आहे. मंगळवारी सायंकाळी भाई नरे, जि.प.माजी बांधकाम सभापती जेरोन फर्नांडिस, आचरा सोसायटी उपाध्यक्ष संतोष मिराशी, विजय(बाबू) कदम, यल्लापा, गुरव, राम लोके उपस्थित होते.
आनंद मिराशी याच्या घरी जाऊन त्याचे वडील कृष्णा मिराशी, नातेवाईक संतोष मिराशी, शर्मिला मिराशी यांच्याकडे लाखो रुपयांचे  धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी अशाच प्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी देखील दिली आहे. त्यांनी केलेल्या या कामाबद्दल आचरा वासियांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स