ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सामुदायिक भातशेतीचा प्रयोग….!</em>

<em>भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सामुदायिक भातशेतीचा प्रयोग….!</em>

प्रकाशन: 28 Jun 2022 05:26 PM
वाचन संख्या 67

श्री पद्धतीने २ एकर मध्ये भात शेती..!

चिंदर/विवेक परब :

मालवण तालुक्यातील हडी या गावात सुमारे दोन एकर क्षेत्रात भाजप किसान मोर्चाच्या टीम कडुन सामुदायिक भातशेतीचा प्रयोग प्रत्यक्ष लावणी करून करण्यात आला आहे.

Article image


भारत हा शेती प्रधान देश आहे. त्यामुळे शेतकरी जगला तर देशाची अर्थव्यवस्था जगु शकते. म्हणुनच भाजपा च्या किसान मोर्चा ने पडीक जमीनी कराराने घेऊन त्यावर सामुदायिक शेतीचा प्रयोग करण्याचे निश्चित करून तातडीने अंमलबजावणी केली आहे.
६४४४ नंबरचे एक काडी लावणी भात हे वाण घेऊन ही लावणी श्री पद्धतीने १० इंच × १० इंचच्या रांगेत कृषी तज्ञ, कृषी अधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली.
ही सामुदायिक शेती किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेशजी सावंत , प्रगतशील शेतकरी व ओझर हायस्कूल चे चेअरमन व किसान मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर नरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली . यासाठी भाजपा किसान मोर्चा चे मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग, उपाध्यक्ष श्री. प्रसाद भोजने, सल्लागार श्री. हरिभाऊ केळुसकर, श्री. संजय मळेकर हे स्वतः ही सामुदायिक शेती गावातील शेतकऱ्यांच्या मदतीने करत आहेत. सध्या होत चाललेला शेतीकडचा दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त लोकांनी पुन्हा शेतीकडे वळावे म्हणून मालवण तालुका किसान मोर्चा हा प्रयत्न करत आहे. शेती साठी हडी मधील गावकर कुटुंबाची दोन एकर क्षेत्र असलेली जागा निवडण्यात आली आहे.अशी माहिती किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी यावेळी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स