ध्यास फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वाटप..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील वराड सावरवाड येथील जिल्हा परिषद शाळा सावरवाड येथे ध्यास फाउंडेशनच्या वतीने संस्थापक सल्लागार सुरेश दत्ताराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शालेय सहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष धोंडी फाटक, उपाध्यक्ष युवराज ढोलम, ज्ञानेश्वर चव्हाण, समीर मुंबरकर, किर्तिराज चव्हाण, शिक्षक तानाजी गावडे, शिक्षिका सोेै. गावडे, अंगणवाडी सेविका दीपिका रावले उपस्थित होते. यावेळी प्रशालेचे शिक्षक तानाजी गावडे यांनी ध्यास फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानले.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)