ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जन आशीर्वाद यात्रेचा आचरा सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडून आढावा.

जन आशीर्वाद यात्रेचा आचरा सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडून आढावा.

प्रकाशन: 24 Aug 2021 11:37 AM
वाचन संख्या 75

भाजपा तालुकाप्रमुख धोंडी चिंदरकर यांनी घेतली निरीक्षक चव्हाण यांची भेट

आचरा | विवेक परब : केंद्रिय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा २६ आँगस्टला आच-यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आचरा नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.त्या अनुषंगाने भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांच्याकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन चव्हाण यांनी घेतला. त्यांनी तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आचरा विभागात आगमन २६ ऑगस्ट रोजी नेमके किती वाजता होईल, त्यावेळी कशा पध्दतीने स्वागत सोहळ्याची तयारी केली जाणार आहे, यादरम्यान किती वाहने या रँली मध्ये असतील, ट्राफिक जाम होऊ नये या व अन्य बाबींचा आढावा सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या कडून घेण्यात आला.
तसेच आचरा तिठा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत झाल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास कसा असणार आहे याची देखील माहिती चव्हाण घेतली गेली. यावेळी तालुका प्रमुख चिंदरकर यांनी या संपूर्ण नियोजनाची माहिती देत प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही देखील सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी दिली.यावेळी संतोष कोदे, संतोष गांवकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स