ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सनराईज सामाजिक संस्थेच्या वतीने आडवली-मालडी मधील शाळांना क्रीडा साहित्य वितरण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सनराईज सामाजिक संस्थेच्या वतीने आडवली-मालडी मधील शाळांना क्रीडा साहित्य वितरण.

प्रकाशन: 26 Jun 2022 03:00 PM
वाचन संख्या 139

गुणवंतांच्याही घरी जाऊन फाऊंडेशनने केला अनोखा सत्कार…!

मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सनराईज सामाजिक संस्था, मालवण यांच्या वतीने आडवली-मालडी गावातील सर्व शाळांमध्ये क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.दिनांक 25 जूनला या साहित्यांचे वितरण करण्यात आले.

Article image
Article image

तसेच आर.ए. यादव हायस्कूल आडवली या प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 100% लागला व सातत्यपूर्ण निकालाची परंपरा अबाधित राखत यंदाही परीक्षेस प्रविष्ट सर्व विद्यार्थ्यांनी निर्भेळ यश संपादन केले.

Article image

यांमध्ये प्रथम क्रमांक अनुक्रमे कु. अनिकेत प्रकाश कदम- 94.40%
द्वितीय क्रमांक: कुमारी श्रावणी सुरेश मेस्त्री- 89.80%
तृतीय क्रमांक: पार्थ अनिल पुजारे- 86.40%
यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Article image
Article image
Article image

यावेळी सनराईज संस्थेचे अध्यक्ष गणेश मालंडकर, मिलिंद चव्हाण, तुषार चव्हाण, विनायक भिडे, सुबोध चव्हाण, प्रणय चव्हाण उपस्थित होते.

सनराईझ फाऊंडेशनच्या शैक्षणिक स्तरावरील या दोन वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दल मालवण तालुक्यातील सर्व स्तरांतून त्यांची प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स