ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डिएसएम परिक्षा दिवसाला दोन पेपर घेणे अन्यायकारक : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ..
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डिएसएम परिक्षा दिवसाला दोन पेपर घेणे अन्यायकारक : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ..

प्रकाशन: 25 Jun 2022 09:51 AM
वाचन संख्या 104

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने डि एस एम परीक्षा पेपर्सविषयी निवेदन देऊन दरदिवशी एकच पेपर घ्यावा अशी मागणी केली आहे.

प्राचार्य श्री धावडे, डीएसएम अभ्यास केंद्र बॅरिस्टर नाथ पै महिला विद्यालय, कुडाळ यांना सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे,सचिव विजय मयेकर,रंजन तेली,प्रेमचंद राठोड,सौ.स्नेहा माईनकर यांनी डीएसएम परिक्षेतील दरदिवशी दोन पेपर या धोरणाचा पुनर्विचार करण्याबाबत निवेदन देऊन विनंती केली आहे. यावेळी प्रा.नितिन बांबर्डेकर,प्रा.अरुण मर्गज हे उपस्थित होते.

Article image

सर्व डीएसएम परीक्षा धारकांना काॅलेजने शुक्रवार दिनांक २३/६/२०२२, रोजी ५.०० वा मेसेज सेंड करुन डीएसएम परीक्षेबाबतचे वेळापत्रक सर्वांना पाठवले , या वेळापत्रकामध्ये दर रविवारी एकाच दिवशी ८० गुणांचे दोन पेपर एक तासाच्या विश्रांती अवधी ने घेणार असे लक्षात येताच संबंधीत प्रमुखांचे याकडे लक्ष वेधले. प्रशिक्षणार्थी यांचे वय, परीक्षेचा एकूण कालावधी, प्रशिक्षणार्थींची परीक्षेसाठी लागणारी पूर्वतयारी,प्रशिक्षणार्थींना येण्या- जाण्यासाठी लागणारा कालावधी,पावसाचे दिवस हे सर्व विचार करता परीक्षा पुर्ण करणे प्रशिक्षणार्थींना अत्यंत कठीण आहे याची जाणीव सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी करुन दिली. परीक्षा वेळापत्रक बनवताना प्रशिक्षणार्थींच्या शारीरिक क्षमतेचा, मानसिकतेचा काहीच विचार केलेला दिसत नव्हता विद्यापीठाने याचा फेरविचार करून प्रत्येक रविवारी “एक पेपर” या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे असे या निवेदनात नमूद केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने प्रत्येक रविवारी एकावेळी एक पेपर घ्यावा अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे.

विद्यापीठापर्यंत सद्य परिस्थिती पोहोचवून सर्व प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून द्यावा,परिक्षा सुट्टी च्या कालावधी मध्ये घेण आवश्यक असुनही यात दिरंगाई केल्याने परिक्षा कालावधी ॴॅन ड्युटी ग्राह्य धरुन परिक्षा पेपर एक दिवस आड घ्यावा अन्यथा परिक्षा ॴॅनलाईन स्वरूपात घ्यावी अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष शिंदे,मयेकर यांनी केली आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमीक अध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष अजय मधुकर शिंदे ,विजय लक्ष्मण मयेकर सचिव,श्री घावरे रामचंद्र शिवराम, सौ. तन्वी नंदकुमार तेंडोलकर, कु. श्रध्दा सतीश देसाई, श्रीम.रामेश्वरी हरिश्चंद्र सामंत,सौ दिपाली दत्तात्रय मिठबावकर,जयदिप अनाजी सुतार,सौ .मनाली मकरंद नाईक,सौ. मानसी मुकुंद वारंग,श्री. राठोड ताराचंद बाबुराव,प्रमिला रघुनाथ राणे,श्री.शामसुंदर वसंत राणे,श्री. हडलगेकर किसन मारुती ,श्री.प्रदीप उत्तम देसाई,सौ. प्रिया विजय मयेकर,अजित शांताराम नाईक,श्री सचिन मुकुंद धुरी,श्री पांडुरंग जानू काळे,श्री.अनंत काणेकर,नेहा गिरीश माईणकर,बोडके गंगाराम नाऊ,भुरे सुर्यकांत विश्वना,निलेश काशिनाथ महेंद्रकर,सौ अपूर्वा दिपक सावंत,श्री.मारूती बापू फाले ,श्रीम.जीविता गोपाळ देसाई,श्रीमती नीलम उत्तम यादव,नंदकुमार नारायण नाईक,नंदकिशोर गजानन नाईक,देविदास वेरलकर परिक्षार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स