ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकच आमदार शिंदेच्या गटात..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रत्नागिरी जिल्ह्यातील एकच आमदार शिंदेच्या गटात..!

प्रकाशन: 23 Jun 2022 04:04 PM
वाचन संख्या 26

आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबतच..

वैभववाडी | प्रतिनिधी :
शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एकच आमदार योगेश कदम यांनी एकनाश शिंदे गटाशी हातमिळवणी केली आहे. उर्वरित गुहागरचे आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि लांजा- राजापूरचे आमदार राजन साळवी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत.

ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. पालकमंत्री अनिल परब यांच्या हॉटेल प्रकरणी रामदास कदम यांचे मोबाईलवरील संभाषण आणि कदम यांना संघटनेपासून बाजूला ठेवले गेल्यामुळेच ते तिकडे गेले असावेत.

मुळ चिपळूणचे आणि सध्या गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे कट्टर शिवसैनिक, सुरवातीला शिवसेना, नंतर राष्ट्रवादी व आता पुन्हा शिवसेनेत आहेत. मंत्री सामंत हे सुरवातीला राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री व सध्या शिवसेनेत कार्यरत आहेत. तर आमदार राजन साळवी हे बाळासाहेबांचे कट्टर सैनिक आहेत. त्यांनी अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचे यापूर्वी अनेकदा जाहीर केले आहे. या सर्वांनी जिल्ह्यात आपापल्या मतदारसंघावर पकड ठेवली आहे. भाजप किंवा राष्ट्रवादीकडून त्यांना आव्हान देणारे नेतृत्व सध्या तरी नाही. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनाच वरचढ राहिली आहे. त्यामुळे हे सर्व आमदार मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबतच राहतील, असे दिसते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुतीच्या तोंडावर त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स