<em>चिंदर सडेवाडी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप…..!</em>
उद्योजक, शिक्षण प्रेमी प्रकाश मेस्री यांच्या कडून वडील दिनकर मेस्री स्मरणार्थ वाटप..!
चिंदर/विवेक परब :
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना चिंदर येथील सुप्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते व पंचक्रोशीत ज्ञात असलेले शिक्षणप्रेमी श्री.प्रकाश मेस्त्री यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप आपले वडील दिनकर मेस्री यांच्या स्मरणार्थ केले. श्री. प्रकाश मेस्री साहेब यांचे शाळा व विद्यार्थी हितासाठी अशाप्रकारचे मोलाचे योगदान नेहमीच मिळत असते. प्रतिवर्षाप्रमाणे शाळेतील सर्व मुलांना वह्या, पेन इ. विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक साहित्य त्यांनी वाटप केले. शाळेस केलेल्या या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ श्रद्धा सुर्वे , उपाध्यक्ष श्री प्रमोद सुर्वे, मुख्याध्यापक श्री संभाजी पवार, सहशिक्षक श्री यशवंत पाटील, पालक व विद्यार्थी आदींनी त्यांचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)