बांदा शहरात प्रथमच २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन..!
बांदा | राकेश परब :
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बांदा आणि पतंजली योग समिती बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २१ जून रोजी सकाळी ७ वाजता बांदा शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदी मंगल कार्यालय कट्टा कॉर्नर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी तसेच योगाभ्यास प्रेमी साधकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ बांदा अध्यक्ष मंदार कल्याणकर, सचिव बाबा काणेकर, पतंजली योग समिती बांदाचे शेखर बांदेकर, पतंजली योगवर्ग डेगवेचे सुदान केसरकर, संतोष सावंत यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)