ताज्या बातम्या
एनसीसीची माजी अंडर ऑफिसर गीतांजली चव्हाणची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड. यजमान महाराष्ट्राचे दोनही संघ, कर्नाटकच्या मुली आणि तामिळनाडूच्या मुलांना चौथ्या दिवसाचे मानांकन..! कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
पाडलोसमध्ये पर्यावरणपुरक कापडी बॅग बनविण्याचे प्रशिक्षण...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पाडलोसमध्ये पर्यावरणपुरक कापडी बॅग बनविण्याचे प्रशिक्षण...!

प्रकाशन: 14 Jun 2022 05:21 PM
वाचन संख्या 53

बांदा | राकेश परब :
ग्रामसचिवालय पाडलोस व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वा वित्त आयोग अंतर्गत आयोजित केलेल्या पर्यावरणपुरक कापडी बॅग प्रशिक्षण कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणात ४० महिलांनी सहभाग घेतला होता. टाकाऊपासून टिकावू या संकल्पनेतून कापडी कपड्यांपासून विविध प्रकारच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्याना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पाडलोसचे सरपंच अक्षरा पाडलोसकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, ग्रामपंचायत सदस्य बंधू व भागिनी, रोणापालचे सरपंच सुरेश गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत माधव, सामाजिक कार्यकर्ते मधुकर परब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, प्रकल्प अधिकारी संजय देसाई, प्रशिक्षक प्रकाश पाटील तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संस्था अध्यक्ष विजययिंह भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी केले तर आभार सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स