केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची हडी ग्रामपंचायतीला भेट..!
केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळत असल्या बद्दल ग्रामस्थांन मधून समाधान व्यक्त..!
चिंदर/ विवेक परब :
केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची थेट संवाद साधला मालवण तालुक्याच्यावतीने हडी ग्रामपंचायत कार्यालय येथे या निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
केंद्र सरकारच्या विविध योजना थेट ग्रामस्थांना पर्यंत पोचतात की नाही त्यात कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी माहिती घेतली ग्रामस्थांनी केंद्र सरकारने योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले, किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, मातृ वंदना योजना, जल जीवन मिशन या सारख्या योजनांचा तसेच कोविड लसीकरण गावात झालेला धान्यपुरवठा या योजना ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, राजु राऊळ, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, हडी सरपंच महेश मांजरेकर, उद्योजक प्रकाश मेस्री, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत तसेच बहुसंख्य भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)