ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ठरला पुरस्काराचा मानकरी..!!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ठरला पुरस्काराचा मानकरी..!!

प्रकाशन: 08 Jun 2022 10:08 PM
वाचन संख्या 46

Award for Excellenceचा मानकरी..!!

उद्या गुरूवार दिनांक ९ जून रोजी नवी दिल्ली येथे होणार विशेष गौरव..!!

मुंबई, दि. ८| ब्युरो न्यूज : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील पाच जिल्ह्यांना २०२०-२१ चे उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सातारा आणि सिंधुदुर्ग (Award for Excellence), वाशिम आणि ठाणे (Certificate of Excellence) तर सोलापूर (Letter of Appreciation) या जिल्ह्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत उद्या ९ जून २०२२ रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी सबंधित जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव पदावरील सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी २०२०-२०२१ (Award of Excellence in District Skill Development Planning-DSDP) या पुरस्कार स्पर्धेत देशातील ३३६ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता.

त्यातून प्राथमिक स्तरावर ३० जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यामध्ये राज्यातील ५ जिल्ह्यांच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे आहेत. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसाम्रगी व कुशल मनुष्यबळाची मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून जिल्ह्याचा वार्षिक कृत्ती आराखडा राज्यातील सर्व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समित्यांमार्फत तयार करण्यात आला आहे.

मागील वर्षीप्रमाणे सन २०२२-२३ करीता सुद्धा आपण स्वत: पुढाकार घेवून जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करावा आणि त्याची यथोचित अंमलबजावणी करून जिल्ह्यातील युवक-युवतींना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता क्षेत्रामध्ये महत्तम संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी केले आहे.

उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडे तयार करुन स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व जिल्ह्यांचे अभिनंदन मंत्री श्री. टोपे यांनी केले असून यापुढील काळात या आरखड्यांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यांनी जास्तीत जास्त युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहन मंत्री श्री. टोपे यांनी केले आहे.

००००

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स