ताज्या बातम्या
श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत.
भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला मानाचा " सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र " पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्गच्या वतीने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला मानाचा " सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र " पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार...!

प्रकाशन: 02 Jun 2022 02:35 PM
वाचन संख्या 50

चिंदर/विवेक परब
कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागातील १६ संशोधन केंद्रांमधून शेती विषयक संशोधन आणि विस्तार कार्य करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला हवामानाचा ” सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र ” पुरस्कार जाहीर झाला, तसेच या पुरस्काराचे वितरण कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सन्मानाची दखल घेत भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक बी.एन.सावंत यांचा सत्कार भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .


भाजपा ची किसान मोर्चा ही शेतकर्यानसाठी कार्यरत असलेली आघाडी आहे. या मोर्चा च्या माध्यमातून शेतकर्यांसाठी विविध योजना. प्रशिक्षणे तसेच मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. या कामी अशा प्रकारच्या संशोधन केंद्राचे मार्गदर्शन घेऊन शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी शेतकर्यांना मदत केली जाते. म्हणुनच अशा संशोधन केंद्राला जर पुरस्कार मिळाला असेल तर त्यांचे कौतुक करणे क्रमप्राप्त आहे असे मनोगत किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी व्यक्त केले.
या सत्कार प्रसंगी सहयोगी संचालक बी. एन. सावंत यांनी आभार व्यक्त करत शेतकर्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी उद्युक्त करावे असे आवाहन किसान मोर्चाच्या पदाधिकार्यांना केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस व कीसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई, नगराध्यक्ष राजन गीरप, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस व प्रीतेश राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील व बाळु प्रभु, किसान मोर्चा जिल्हा महिला संयोजक दिपा काळे, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ केळुसकर, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, किसान मोर्चा मालवण मंडल अध्यक्ष महेश श्रीकृष्ण सारंग, किसान मोर्चा ओरस मंडल अध्यक्ष सूर्यकांत नाईक, प्रगतशील शेतकरी प्रकाश झेंडे, शेतकरी मित्र महादेव नाईक, प्रगतशील शेतकरी व तुळस सो.सा.चेअरमन संतोष शेटकर, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर, किसान मोर्चा वेंगुर्ले ता.सरचिटणीस सत्यवान पालव, शैलेश जामदार, सौरभ नाईक, आडारकर इत्यादी भाजपा पदाधिकारी व किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 159
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 93

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स