ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
आंतरजिल्हा बदली पात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न मिटला..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आंतरजिल्हा बदली पात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न मिटला..!

प्रकाशन: 02 Jun 2022 04:43 PM
वाचन संख्या 34

जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांची माहिती…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

  आंतरजिल्हा शिक्षक बदलीसाठी १० टक्के रिक्त पदांची असलेली अट शासनाने रद्द केली आहे. या अटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली रखडल्या होत्या. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक भरतीने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर संघटनेचे नेते आमदार कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी यशस्वी चर्चा केल्यानंतर शासनाने ही अट रद्द केली आहे. परिणामी जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली पात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न मिटला आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त पदांची टक्केवारी १० टक्के पेक्षा जास्त असल्याने शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीस शासनाने मान्यता दिली नव्हती .आंतरजिल्हा बदलीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गने गेली दोन वर्षे सतत प्रयत्न केले होते.
शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकास सचिव, ग्रामविकास मंत्री यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होण्यासाठी निवेदन, प्रत्यक्ष भेटी, व्हिडिओ कॉन्फरन्स याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
तसेच जिल्हा परिषद समोर एकदिवसीय धरणे आंदोलने व लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. तथापि हा प्रश्न सुटत नसल्याने शिक्षक भारतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षक संघटनाच्या इतिहासात प्रथमच सलग १० दिवस अभूतपूर्व धरणे आंदोलन केले याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाशी पत्रव्यवहार केला होता.
तसेच ग्रामविकास विभागाचे उपसचिव व आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व शिक्षक भारतीचे शिष्टमंडळ यांची यशस्वी चर्चा झाली होती.
शिक्षक भारतीचे शिष्टमंडळ, कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.
या प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ,आमदार कपिल पाटील यांची बैठक झाली.या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली त्यावेळीच आंतरजिल्हा बदली मध्ये १० टक्के पेक्षा जास्त रिक्त जागा असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.
शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे यश म्हणून १ जून २०२२ रोजी शासनाने आंतरजिल्हा बदलीमध्ये जिल्ह्यांचा समावेश होण्याबाबत परिपत्रक निर्गमित केले आहे .
यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते २० वर्षे शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सर्व आंतरजिल्हा बदली ग्रस्त शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी शिक्षक भारती व आमदार कपिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी संघटनेच्या कार्यपद्धतीने प्रभावित होवून यापुढे शिक्षक भारतीला पाठिंबा देणार जाहीर केले आहे.
आंतरजिल्हा बदली या अभूतपूर्व लढ्याला यश मिळण्यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार कपिल पाटील ,राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड, सुभाष मोरे, संजय वेतुरेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व तालुका कार्यकारणी व एकजूट दाखवून शिक्षक बदली बांधव यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याबद्दल शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स