ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भरड नाका ते केळबाई मंदिर रस्त्याचे पक्के डांबरीकरण केंव्हा होणार..?? : त्रस्त नागरिकांचा सवाल..!!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>भरड नाका ते केळबाई मंदिर रस्त्याचे पक्के डांबरीकरण केंव्हा होणार..?? : त्रस्त नागरिकांचा सवाल..!!</em>

प्रकाशन: 01 Jun 2022 07:55 PM
वाचन संख्या 33

प्रवाशांना भोगावा लागत आहे नाहक त्रास..!!

मालवण | सुरेश बापर्डेकर : मालवण तालुक्यातील भरड नाक्यावरून तारकर्ली देवबाग ला जाणारा मुख्य रस्ता गेली दोन वर्षे इतका खराब झाला आहे की,काही ठिकाणी टू व्हीलर चालविणे मुश्किल झाले आहे. गेल्या पावसाळ्यात याच रस्त्यावरून मालवण व इतरहून गणेश भक्तांनी आपले गणपती कसे बसे नेले .यावर्षी तीच पूनरारुत्ती होणार काय अशी शंका ये जा करणाऱ्या पर्यटकांच्या चालकांना आणि आजू बाजूच्या नागरिकांना सतावत आहे.
मालवण भरड नाका ते देवी केळबाई मंदिर हा नगरपालिकेच्या अक्त्यारित येत असून नगरपालिकेचा याकडे दुर्लक्ष का होत आहे.हा तारकर्ली मार्गावरील वाहतूक रस्ता इतका खराब आणि नादुरुस्त झाला असला तरी या रस्त्यावरून पर्यटकांच्या वाहनांची आणि स्थानिक नागरिक वाहन यांची वारंवार वर्दळ असते .रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्ता अतीशय खराब झाला आहे की मोठ्या वाहनांना बरोबर टू व्हीलर यांना आपली गाडी चालवणे मुश्किल होत असून कित्येक वेळा तारेवरची कसरत वाहन चालक यांना करावी लागते.सदर रस्ता गेली दोन वर्षे इतका खराब झाला आहे की नागरिक आणि पर्यटक काय करावं हे विचारात वाहन चालवत असतात. सदर रस्ता हॉट मिक्स डांबरीकरण करणे आवश्यक असल्याने लवकरात लवकर करावे. असे ग्रामस्थ आणि नागरिक यांच्याकडून होत आहे. सदर रस्ता मा.नगराध्यक्ष साहेबांनी गणपतीच्या वेळी आश्वासन दिलेले की हा रस्ता गणपती नंतर बनविला जाईल असे म्हंटले होते. परंतु या एक महिन्यात इतर बऱ्याच ठिकाणचे छोटे मोठे रस्ते डांबरीकरण होत आहेत.आणि हा मुख्य रस्ता तसाच राहिला.या रस्त्यावर दुर्लक्ष का होत आहे हेच कळत नाही.तरी पुन्हा एकदा प्रवाशी नागरिक ,ग्रामस्थ यांच्या वतीने विचारणा केली जाते की,पावसाळा सुरू होण्यापूर्वी बनून मिळेल की नुसते खड्डे बुजून दिले तर गणपती मध्ये परत जशास तसे होऊन होणारा नाहक त्रास तसाच रहाणार तरी सर्वांन कडून लवकरात लवकर भरड ते देवी केळबाई मंदिर रस्ता हॉटमीक्स डांबरीकरण करावे ही पुन्हा एकदा आग्रही विनंती होत आहे .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स