वैभववाडीत आ. नितेश राणे यांचा शिवसेनेला दुसरा जोरदार धक्का..!
कुर्ली गावातील सेनेचे शाखाप्रमुख व उप .शाखाप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…!
पक्ष प्रवेशासाठी आमच्यावर कोणीही जबरदस्ती केली नसून गावचा विकास हा भाजपा व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातूनच म्हणून केला पक्षप्रवेश ;पक्षप्रवेशकर्ते यांनी व्यक्त केली भावना….
आमदार नितेश राणे यांनी केले सर्वांचे पक्षात स्वागत….
वैभववाडी | विवेक मालवणकर-
आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यात पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. कुर्ली गावचे शिवसेनेचे शाखाप्रमुख मधुकर विठोबा कोकरे व ऊप शाखाप्रमुख मधुकर रघुनाथ सुतार यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे.
वैभववाडी तालुक्याचे माजी सभापती व कुर्ली गावचे उपसरपंच अंबाजी हुंबे यांनी दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशानंतर सेनेचे तालुकाध्यक्ष मंगेश लोके यांनी भाजपात होणारे प्रवेश हे जबरदस्तीने होत असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपानंतरही सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः भाजपा कार्यालयात उपस्थित राहून पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेशासाठी आमच्यावर कोणीही जबरदस्ती केली नसून गावचा विकास हा भाजपा व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातूनच होऊ शकतो. गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपात जाहीर प्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आज वैभववाडी पक्ष कार्यालयात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कुर्ली गावातील सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. या प्रवेशामुळे कुर्ली गाव शतप्रतिशत भाजपा झाले आहे. प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मधुकर कोकरे, मधुकर सुतार, श्री. शेळके, बबन पांडुरंग कोकरे, प्रभाकर संतोष हुंबे, अरुण गणपत महाडिक, राजाराम तुकाराम साटम, चंद्रकांत तेली, श्री. सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी भाजप आमदार नितेश राणे, भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुका अध्यक्ष नासीर काझी, वाभवे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नेहा माईनकर, जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे, जयेंद्र रावराणे,अरविंद रावराणे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी नवलराज काळे, माजी सभापती अंबाजी हुंबे, बाबा कोकाटे, वैभववाडी तालुका भटके-विमुक्त आघाडीचे युवा अध्यक्ष सूर्यकांत बोडके,नानिवडेकर मॅडम, महिला जिल्हा सरचिटणीस स्नेहलता चोरगे,शुभांगी पवार, महिला वैभववाडी तालुका अध्यक्ष प्राची तावडे, नगरपंचायत बांधकाम सभापती विवेक रावराणे, आरोग्य शिक्षण व सांस्कृतिक सभापती रेवा बावदाने, नगरसेविका संगीता चव्हाण, नगरसेविका सुप्रिया तांबे, नगरसेवक रोहन रावराणे, युवा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, लोरे पंचायत समिती शक्ती केंद्र प्रमुख रितेश सुतार, कोकिसरे शक्ती केंद्रप्रमुख प्रदीप नारकर, कुर्ली गावचे ग्रामपंचायत सदस्य सूरज तावडे, प्रकाश विकास सोसायटी कुर्ली चे विद्यमान संचालक मधुकर कोकरे,भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी कार्यकर्ते व धनगर समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)