देऊळवाडा पुल परिसरातील नागरिकांनी मानले मुख्याधिकारी न.प.प्रशासनाचे आभार;मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा यशस्वी पाठपुरावा.
गाळ उपसा करण्याचे काम उद्या पासून होणार सुरू ;चतुर्थीत गणेश विसर्जन पुर्णत: होत नसल्याची व्यक्त केली होती खंत..!
प्रशासक मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी पुलातील गाळ काढण्यासाठी १ लाख केले मंजुर..!
मालवण | प्रतिनिधी :
देऊळवाडा परिसरातील नागरिकांनी दोन महिन्यापूर्वी मालवण नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक श्री.संतोष जिरगे तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देऊळवाडा पूल परिसरात माती व गाळ मोठा प्रमाणात साचला आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी मध्ये रस्त्यावर पाणी साचून राहते व आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होतो तसेच गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश विसर्जन करताना अनेक गणपतीचे विसर्जन संपूर्णतः होत नाही त्यामुळे आपण आपल्या अधिकाराखाली गणपती विसर्जन भागातील पुलाखालील साचलेला गाळ काढण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी निवेदन दिले होते.
या निवेदनाचा यशस्वी पाठपुरावा मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला त्याची दखल घेत मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी काल १ लाख रुपये निधी मंजूर केला.गाळ उपसा करण्याचे काम उद्या पासून सुरू होणार आहे याबद्दल देऊळवाडा पुल परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी व नप प्रशासनातील अवेक्षक सुधाकर पाटकर अभियंता सोनाली हळदणकर यांचे आभार मानले असल्याची माहिती मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की गेली पंचवीस वर्ष या भागातून निवडून दिलेले नगरसेवक देऊळवाडा फुलातील गाळ व माती उपसा करण्याचे काम करू शकले नाहीत पण जागरूक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकार्यांचे लक्ष वेधले आणि मुख्याधिकारी यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन काम मार्गी लावले त्यामुळे आता निवडून दिलेल्या देवूळवाडा प्रभागातील सर्व नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करावे. नागरिकांमध्ये एकी असेल तर नगरसेवकांशिवाय कामे मार्गी लागतात हे लक्षात ठेवावे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)