<em>चिंदर ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांची 139 जयंती साजरी…..!</em>
चिंदर |विवेक परब :
प्रतिभेचा महासूर्य, महाकवी, लेखक, वक्ता, नेता, भाषातज्ञ असे अनेक आयाम व्यक्तिमत्वाला लाभलेले. राष्ट्रधर्म हाच सर्वोपरी आहे, त्यासाठी भेदभाव विसरून सर्व समाजाने एकत्र आले पाहिजे, यासाठी प्रयत्न एक विज्ञाननिष्ठ, थोर मानवतावादी नेते, भारत मातेचे वीरसुपुत्र, 50 वर्षे जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा भोगून सक्रिय कार्य करत, इतिहास व राजकारणाचा गाढा अभ्यासक असलेले तत्वचिंतन कर्म योगी स्वातंत्र्यवीर तात्याराव विनायक दामोदर सावरकर यांची आज 139 वी जयंती.
चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज सावरकरांच्या प्रतिमेला उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना सुर्वे म्हणाले की सावरकरांची देशभक्ती व त्यांनी केलेला त्याग कायम स्मरणात राहिल. त्यांनी तुरुंगातही वाचनालय चालू केले होते. अशी वाचन संस्कृती आताच्या सोशल मिडियाच्या काळात गावागावात होणे गरजेची आहे.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर, रणजीत दत्तदास, सौ. गोलतकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)