ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विद्यार्थी आत्मविश्वास गमावायच्या अगोदर शाळा लवकर सुरु करा..

विद्यार्थी आत्मविश्वास गमावायच्या अगोदर शाळा लवकर सुरु करा..

प्रकाशन: 21 Aug 2021 07:19 AM
वाचन संख्या 131

नॅशनल अ‍ॅण्टी करप्शन अ‍ॅण्ड अ‍ॅण्टी अ‍ॅट्राॅसिटी टायगर फोर्स सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांची मागणी.

मालवण | प्रतिनिधी : मुलांना परीक्षांमधून मिळालेल्या गुणांचा आणि प्रवेश प्रक्रीयेचा टाळेबंद जुळत नसल्याने विद्यार्थी ,पालक संभ्रमावस्थेत असल्याने सद्यस्थितीत शाळा लवकरात लवकर सुरु कराव्यात अन्यथा विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम व्हायला सुरवात होईल.अशी भिती नॅशनल ॳॅण्टी करप्शन ॳॅण्ड ॳॅण्टी ॳॅट्राॅसिटी टायगर फोर्स सिंधुदुर्ग चे जिल्हा अध्यक्ष व शालेय शिक्षक अजय शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
       दहावी ,बारावी परीक्षांमध्ये नव्वद टक्के गुण मिळवुनही चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही ही भावना विद्यार्थ्यांना नैराश्या कडे नेणारी आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ॴॅनलाईन शिक्षणामध्ये न मिळणारे नेटवर्क हा मोठा अडसर असून तो दूर करण्यापेक्षा शाळाच सुरु करा अशी भावना पालक व विद्यार्थी यांची झालेली दिसून येत आहे.सेतु अभ्यासक्रम ,चाचणी परीक्षा यांच्या बाबतीत मोबाईल रेंजचा अडसर असल्याने शिक्षकांना वाडी,वस्तिवर मुलांना प्रश्नपत्रिका पोहचवणे , उत्तरपत्रिका गोळा करणे यासाठी फिरावे लागत आहे.
गेले दिड वर्ष शाळा बंद स्थितीत आहेत.या दिड वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे झालेलं शैक्षणिक नुकसान पुढील दशक भर चिंतेच वातावरण असेल.
याच सोबत मोबाईल च्या अतिरिक्त वापराने होत असलेले डोळ्यांचे आजार ही एक गंभीर समस्या आहे.
            शिक्षकांना कोविड ड्युटी साठी वापरुन ,शिक्षण व कोविड ड्युटी यामध्ये होणारी शिक्षकांची ससेहोलपट थांबवावी, शाळा सुरु करत शिक्षकांना शिक्षण प्रवाहात आणुन विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ,शाळेची घंटा लवकरात लवकर वाजवून शासनाने विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी टायगर फोर्स च्या वतिने जोर धरु लागली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स