आमदार नितेश राणेंवरील सतीश सावंत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे ; भाजप भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे कडाडले..
सतिश सावंत यांना तथाकथीत कार्यकर्त्याचे नाव जाहीर करण्याचे केले आवाहन.
वैभववाडी | विवेक मालवणकर : शिवसेना नेते सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा बँकेचे सद्य भाजप संचालकांवर व भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावरती जिल्हा बँकमधील ‘नोकरी बचाव भाजप बढाव’ अशी संकल्पना चालू असल्याचा थेट आरोप केला . त्यात वैभववाडी तालुक्यातील एका कार्यकर्त्याला मुलाची नोकरी वाचण्यासाठी भाजप प्रवेश करणे करीता दबाव करत असल्याचे वक्तव्य सतीश सावंत यांनी केले. त्यावर ती भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी कडाडून प्रत्युत्तर दिले आहे.
नवलराज काळे यांनी एक प्रसिद्धीपत्र जाहीर करुन त्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की सहकार क्षेत्राशी आपला काही थेट संबंध जरी नसला तरी आमदार नितेश राणे यांच्यावर जर अशी टीका होत असेल तर आम्हाला बोलणे भाग आहे. ती टीका जर वैभववाडी तालुक्यातील उदाहरण देऊन जनतेची दिशाभुल करणार असेल तर आम्ही कडाडून प्रत्युत्तर देणार. माजी जिल्हा बॅन्क अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. नोकरी बचाव भाजप बढाव अशी टीका सतीश सावंत यांनी आमदार नितेशजी राणे साहेब यांच्यावर केली आहे. सतीश सावंत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये वैभववाडी तालुक्यातील एका कार्यकर्त्याला त्याच्या मुलाची नोकरी वाचवण्यासाठी भाजप पक्ष प्रवेश करण्याचा प्रयत्न चालू आहे असा उल्लेख केला आहे. मी सतीश सावंत यांना आवाहन करतो की तर त्यांनी वैभववाडीतील त्या तथाकथीत कार्यकर्त्याचे नाव जाहीर करावे व केलेले आरोप पुराव्यांसहित सिद्ध करावेत. आमदार नितेश राणे यांच्यावर नाहक बिनबुडाचे आरोप करू नयेत आम्ही ते कदापि सहन करणार नाही व गप्प ही बसणार नाही.
नोकरी बचाव व भाजप बढाव अशी संकल्पना राबवण्याची भाजपला अजिबात गरज नाही भाजप आपल्या कार्यातूनच आपला पक्ष वाढवत आहे. प्रथम राष्ट्र,नागरिक,नंतर पक्ष आणि नंतर स्वतः असे ब्रीद उराशी बाळगून अखंड भारत देशभर भाजपा आपली यशस्वी वाटचाल करीत आहे.
2019 मधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचे कार्यकर्ते कोणत्या कारणामुळे शिवसेनेत गेले कोण जिल्हा बँक सत्तेचा दुरुपयोग करत होते याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे. वैभववाडी तालुक्यातील जनता, मतदार जागृत आहे त्यांना सर्व काही ज्ञात आहे. निवडणुकीमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी वरती कसा दबाव होत होता हे ही जनतेने पाहिले आहे. त्यामुळे सतीश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत.
‘शीशे के घर रहने वाले पत्थर फेका नही करते’ असे सांगत त्यामुळे आरोप करताना सांभाळून करावेत.
सत्ते मधील नेते आहात विकासाचे बोला… वैभववाडी तालुक्यासहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले होते वादळी पाऊस झाल्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, पाऊस वादळसहित गारपीट झाल्यामुळे जिल्ह्यातील आंबा,काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला असून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र राज्यातील महा विकास आघाडी सरकारमधील आपला शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाचे नेते म्हणून नुकसानग्रस्तांना नुसकान भरपाई देण्याकरिता आपण काय प्रयत्न केले व आपण काय करणार आहात यावर ही थोडी माहिती जनतेला दिली तर बरं होईल. नुसते राणे कुटुंबीय आणि भाजप यांच्या वरती टीका करून काही उपयोग होणार नाही जनतेला काम पाहिजे विकास पाहिजे आणि विश्वास पाहिजे आणि ते महा विकास आघाडीकडून जनतेला दिसून येत नाही असा पलटवार करुन भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी चे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी सतिश सावंत व शिवसेना पक्षाला प्रसिद्धीपत्रातून आव्हान दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)