ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावचे सुपुत्र श्री बाबू चिंचु बोडेकर यांचे निधन..

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे गावचे सुपुत्र श्री बाबू चिंचु बोडेकर यांचे निधन..

प्रकाशन: 29 Apr 2022 12:31 PM
वाचन संख्या 127

धनगर समाज उत्कर्ष मंडळ ठाणेचा संस्थापक वृक्ष हरपल्याने समाजात हळहळ.

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या खांबाळे गावचे सुपुत्र श्री बाबू चिंचू बोडेकर ( वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
२१ एप्रील रोजी ठाणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिवंगत बाबू चिंचु बोडेकर हे परिवारातील सहा भावातील थोरले होते.
१९९६ साली स्थापन झालेल्या धनगर समाज उत्कर्ष मंडळ ठाणे
संस्थापक सदस्य म्हणून संस्थेच्या स्थापनेकरिता त्यांनी भूमिका बजावली होती. धनगर समाजातील सन्माननीय व्यक्तीमत्व असा त्यांचा परिचय होता.

दिवंगत बाबू बोडेकर यांच्या पश्चात सून, ३मुली,३भाऊ, १०पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
वैभववाडी तालुका सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष कै. राजू बोडेकर यांचे ते वडील होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स