मनसेच्या अमित इब्रामपूरकरांचा आमदार वैभव नाईक यांना सल्ला..!
आमदार अमोल मिटकरी व ब्राम्हण समाजाच्या खिल्लीचे प्रकरण..!
मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागून मनाचा मोठेपणा दाखवावा असे सांगणार्या आमदार वैभव नाईक यांनी प्रथम स्वतःची नौटंकी थांबवावी. जिल्ह्यातील ब्राम्हण समाज अज्ञानी नाही. ब्राह्मण समाजाची सहानुभूती मिळण्यासाठीच आमदार नाईक अशी वक्तव्ये करत आहेत.त्यामुळे आमदार मिटकरी यांना सल्ले देण्यापेक्षा सत्तेचा रिमोट हातात असलेल्या शरद पवारांना त्यांची कान उघडणी करण्यासाठी सांगावे असे मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.
आमदार मिटकरी यांनी सांगली इस्लामपुरात झालेल्या जाहीर सभेत हिंदू समाजाच्या चाली रिती आणि परंपरा यांची खिल्ली अमोल मिटकरींनी उडवली आहे.संस्कृत भाषेत मंत्रोच्चाराचे पठण केले. त्यामुळे ब्राम्हण समाजात सर्वत्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. मिटकरी ही व्यक्ती राज्याचा जबाबदार आमदार असून, त्यांनी हिंदू समाजात पौरोहित्य करणाऱ्यां बाबत आणि विवाह परंपरेबाबत स्वतःला कुठलेही ज्ञान नसतांना चुकीचे विधान करून समाजाची खिल्ली उडवली आहे. त्यांनी अकारण जातीय तेढ निर्माण केली आहे. अशा प्रकारची कृती बालिश बुद्धीतून आणि अमानवीय असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.
आमदार अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.सत्तेसाठी शिवसेना या पक्षाबरोबर युती केलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल आहे.त्यामुळे आमदार वैभव नाईकांनी आमदार मिटकरींना ब्राम्हण समाजाची माफी मागण्याचा सल्ला देण्याची नौटंकी करण्यापेक्षा ब्राम्हण समाजाचा द्वेष करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि पुढे असे वक्तव्य न करण्याबाबत सत्तेचा रिमोट कंट्रोल असलेल्या शरदराव पवार यांना साकडे घालावे असा सल्ला मनसेच्यावतीने अमित इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईकांना दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)