ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे शाळेत 'शाळा पूर्व तयारी' अभियानाचे उद्घाटन.

जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे शाळेत 'शाळा पूर्व तयारी' अभियानाचे उद्घाटन.

प्रकाशन: 15 Apr 2022 12:36 AM
वाचन संख्या 58

बांदा | राकेश परब : जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे नुकतेच बांदा निमजगा व शाळा बांदा सटमठ संयुक्त रित्या शाळेत शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

जि प पूर्ण प्राथमिक शाळा बांदा निमजगा येथे सन २०२२-२३ इयत्ता १ ली दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांचां शाळा पूर्व तयारी अभियान उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित बांदा सरपंच मा श्री अक्रम खान सर, ग्रामपंचायत सदस्य मा श्री बाळू सावंत, निमजगा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संदीप बांदेकर , सटमटवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीक्षा मावळणकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर सावंत , श्री शैलेश शेटकर, आनंद देसाई , केंद्र प्रमुख श्री एस डी गवस, सर्व शिक्षा अभियान विषय तज्ञ श्री प्रसाद सांगेलकर, श्री स्वप्निल राहूळ, अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, देवयानी डेगवेकर, श्रीमती आमेलकर, श्रीम गावडे, श्रीमती शोभा बांदेकर, चारुशीला परब सर्व बांदा बीट अंगणवाडी ताई, मदतनीस, उपस्थित होते. प्रथम इयत्ता १ ली दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांनची प्रभात फेरी काढण्यात आली. त्याप्रमाणे सर्व दाखल पात्र मुलांचे मुख्याध्यापक श्रीमती प्राजक्ता राऊळ, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मुलांना ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून एकूण अभ्यासक्रम निगडित ७ स्टॉल लावण्यात आले. यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन पहिलीत येणाऱ्या मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक श्रीम प्राजक्ता राऊळ मॅडम केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शरद राऊळ मुख्याध्यापक बांदा सटमठवाडी यांनी केले. तसेच सूत्र संचालन श्रीम सुवर्णा भाईप, व आभार श्रीमती लुईजा गोन्सालवीस यांनी मानले.
श्री मालू लांबर उप शिक्षक, श्रीम मंगल दराडे उप शिक्षिका श्री प्रशांत पवार उप शिक्षक बांदा सटमठवाडी तसेच अंगणवाडी ताई, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स