ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी.....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा येथे श्रीरामनवमी उत्साहात साजरी.....!

प्रकाशन: 11 Apr 2022 09:18 AM
वाचन संख्या 57

बांदा |राकेश परब : श्री रामनवमीचा सण बांदा येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा कऱण्यात आला.गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे भाविकांना हा सण साजरा करता आला नव्हता.यंदा हा सोहळा मोठ्या भव्यतेने साजरा झाला.
बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात भजन व नामस्मरण करत रामनामाच्या गजरात दुपारी ठिक बारा वाजता श्री रामाला पाळण्यात घालण्यात आले. यावेळी भाविकांनी फुलांचा वर्षाव केला.त्यानंतर ढोलताशाच्या गजरात प्रभु श्रीरामचंद्रांची पालखी निघाली. श्री बांदेश्वर मंदिरातही याच वेळेत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात श्रीरामजन्माचा सोहळा होऊन वाजतगाजत पालखी निघाली. मार्गात दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा झाला. त्यानंतर पारंपारिक मार्गाने विविध देवस्थानांची श्रीरामभेट करुन पालख्या मंदिरात परत आल्या.
बांदा साईमठातही पहाटे काकडआरती,पुजा ,श्रीरामप्रभुंची मिरवणुक,दुपारी महाप्रसाद यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संत सोहिरोबानाथ आंबिये मठातही श्रीरामजन्मोत्सव तसेच संत सोहिरा निर्याणदिन साजरा झाला. पानवळ येथिल श्रीरामपंचायतन मंदिरातही संपुर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स