चिंदर येथे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रस्ता विकास कामांचा शुभारंभ….!
चिंदर | विवेक परब: केंद्रीय लघु, मध्यम, आणि सुष्म उद्योगमंत्री नारायण राणे (दादा) यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन चिंदर मध्ये चिंदर तेरई ते चिंदर सडेवाडी तसेच दत्तमंदिर, चर्मकार कोंड ते पालकरवाडी (डिपी) अशा रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न झाले. चिंदर तेरई रस्त्याचे भूमिपूजन बाळा घागरे हस्ते तर दत्तमंदिर पालकरवाडी रस्त्याचा शुभारंभ चंद्रशेखर पालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. यावेळी चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य केदारजी (पप्पू) परुळेकर, रिया घागरे, स्वरा पालकर, शशीकांत नाटेकर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, रवी घागरे, मनोज हडकर, बाळा पालकर, प्रिया पालकर, गजा पाटणकर, राजु पालकर, रविंद्र लब्दे, केदार गांवकर, कृष्णा पालकर, सुभाष पालकर, बाळकृष्ण घागरे, पुरुषोत्तम परब, अभिनाथ घागरे, गणेश घागरे, विठ्ठल परब, जितेंद्र साटम, चंद्रकला घागरे, लक्ष्मी मेस्त्री, अनंत आचरेकर, गोपाळ पालकर, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)