<em>तांबुळी येथील कँन्सरग्रस्त सपना सावंत यांना वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज</em>
बांदा | राकेश परब : तांबुळी (मधलीवाडी) येथील कँन्सर आजाराने ग्रासलेल्या सपना संजय सावंत (वय ३८) यांना कोरोना संकटामुळे व गरिबीमुळे नियमित उपचार घेणे कठीण झाले आहे. गेले सहा महिने गोवा बाबुळी येथे सावंत यांच्यावर उपचार सुरु आहेत. दर आठवड्याला उपचारासाठी गोव्यात जावे लागत आहे. यासाठी सावंत कुुटंबीयांनी सामाजिक दात्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
सपना यांच्यावर सध्या गोवा -बाबुळी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांना दिड व बारा वर्षाचे असे दोन मुलगे आहेत.पती संजय सावंत कोरोनांच्या संकटामुळे वास्को निवाडे येथे चहा विक्रींचा व्यवसाय गेले दोन वर्षे बंद आहे. तसेच त्यांची तांबुळी येथील घरची आर्थिक परिस्थीती अत्यंत हलाखीची आहे.
या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज असून,ज्या दानशूरांना आर्थिक मदत करायची आहे. त्यांनी सपना संजय सावंत, बँक आँफ बडोदा शाखा वास्को द गामा, गोवा खाते क्रमांक – ०४९३०१०००१६२०७ ,(IFSC-B-RB0V-SCOD) या खात्यावर पाठवावी,असे आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)