नगरपंचायतला 'अड्डा' म्हणायच्या आधी त्यांचे 'ते' दिवस आठवावेत : नगराध्यक्ष समीर नलावडे
संदेश पारकरांवर केली प्रखर टीका.
कणकवली | प्रतिनिधी : येत्या वर्षभरात कणकवली नगरपंचायतची निवडणूक होणार असून संदेश पारकर यांना शिवसेनेच्या वरिष्ठांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास सांगितले असावे. शिवसेनेत कुठलेही पद न मिळाल्याने पारकर नगरसेवक निवडणुकीची तयारी करत असावेत असा माझा समज असल्याचे सांगत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यावर प्रखर टीका केली आहे.
कणकवली नगरपंचायतचे नांव बदनाम करण्याचा प्रयत्न संदेश पारकर यांच्याकडून होत असल्याचा आरोपही नलावडे यांनी केला आहे . राजकारणात ज्युनिअर असणाऱ्या वैभव नाईक यांचा पीए म्हणून मंत्रालयात काम करणाऱ्या संदेश पारकर यांनी मागील दिवस आठवावेत. स्वतः नगराध्यक्ष असताना नगरपंचायत चे बेअरर चेक काढून नगरपंचायत चे पैसे कसे लाटलात हे जनतेला माहिती आहे. थकबाकी ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे अनेक कार्यकर्ते का सोडून गेले ? याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ संदेश पारकर यांनी करावे.लगतच्या घरांना धोका असल्याने पाडलेल्या मोरये बिल्डिंग वादात पारकर यांना पडण्याची गरज नव्हती.या विषयात पडून कणकवली शहरात तणाव निर्माण करण्याचा डाव संदेश पारकर यांचा आहे.
नगरपंचायतला अड्डा म्हणणाऱ्या माजी नगराध्यक्ष पारकर यांचे अड्डे कणकवलीकर जाणून आहेत.जुगार, पट, गांजा विक्री कणकवली शहरात कोणाचे कार्यकर्ते कोणाच्या वरदहस्त असल्याने करतात हे लवकरच जनतेसमोर आणणार आहे. भालचंद्र महाराज आणि आप्पासाहेब पटवर्धनांचे नांव घेत शहरातील युवा पिढी बरबाद करताना लाज वाटली पाहिजे .पोलिसांवर आळ घेताना साळुंखे नामक पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला आणि शहरातून पळ काढला होता हे विसरू नकात. http://localhost/news/public/uploads/2003 साली मी सोबत होतो म्हणून नगराध्यक्ष झालात. जेव्हा मी http://localhost/news/public/uploads/2007 साली पारकरांची साथ सोडली तेव्हापासून पारकर कणकवली नगरपंचायत सत्तेपासून लांब आहेत. पारकरांवर विश्वास नाही म्हणूनच कणकवलीकरानी त्यांना पराभूत करून मला नगराध्यक्ष केले. शहरवासीयांचा माझ्यावर आणि उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आणि सहकारी नगरसेवकांवर विश्वास असल्यानेच http://localhost/news/public/uploads/2003 पासून नगरपंचायत ची सत्ता आमच्याकडे आहे.नगरपंचायतला अड्डा म्हणताना लाज वाटली पाहिजे. यापुढे अशी वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नाही.प्रसंगी टोकाचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर असा इशारा नगराध्यक्ष नलावडे यांनी दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)