वेंगुर्ले येथे गुढीपाडव्याला नववर्षाच्या स्वागत यात्रेचे आयोजन..!
चिंदर | विवेक परब : यंदा गुढीपाडव्याला हिंदू बांधवांच्या घराघरावर गुढ्या-तोरणे उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत केले जायच्या उद्देशाने २ एप्रिल रोजी संध्याकाळी ५.०० वाजता वेंगुर्ले हिंदू धर्माभिमानी मंडळीच्यावतीने “भव्य दिव्य स्वागत यात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे. या स्वागत यात्रेचा मार्ग रामेश्वर मंदिर–शिरोडा नाका–जुना एसटी स्टँड–दाभोळी नाका–मार्केट–मारुती मंदिर ते रामेश्वर मंदिर असा असणार आहे.वेंगुर्ले वासियांनी यात्रेची शोभा वाढवण्यासाठी पारंपारिक वेषात सहभागी व्हावे असे आवाहन हिंदू धर्माभिमानी मंडळीनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)