ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गो प्रवेशाने अक्कलकोट वटवृक्ष मंदिर गाभाऱ्यातील स्थान शुद्धी!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गो प्रवेशाने अक्कलकोट वटवृक्ष मंदिर गाभाऱ्यातील स्थान शुद्धी!

प्रकाशन: 28 Mar 2022 04:12 PM
वाचन संख्या 59

वास्तु पुजा, प्रतिष्ठा होम, रक्षोज्ञा होम आदी विधींनी मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वातानुकूलित गाभारा मंडपाचे व गर्भगृहाचे काम पुर्ण झाल्यानंतर नियोजीत धार्मिक विधीनुसार मुर्ती प्रतिष्ठापना धार्मिक विधी सुरू झाले आहेत. मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे व विश्वस्त मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वास्तु पुजा, प्रतिष्ठा होम, रक्षोज्ञा होम आदी विधी मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली, मंदार मोहनराव पुजारी व सौ.मुग्धा मंदार पुजारी यांच्या हस्ते कर्नाटकच्या उडपी येथील राघवेंद्र भट, श्रीधर भट, दिनेश भट, प्रसन्ना भट, कृष्णा भट, सुब्रमण्यम भट आदींसह स्थानिक ब्रह्मवृंद यांच्या विधिवत मंत्रोच्चारात व सनईच्या मंजूळ स्वरात संपन्न झाल्या. यानंतर वटवृक्ष मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या मुळ गाभाऱ्यात महेश इंगळे, विश्वस्त मंडळ, व मंदीर सेवेकरी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पुरोहीत मोहन पुजारी, मंदार पुजारी व ब्रम्हवृंद यांच्या विधीवत गोपुजेने व गाभारा गो प्रवेशाने गाभार्‍यातील स्थान शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी वास्तु पुजा, प्रतिष्ठा होम, रक्षोज्ञा होम आधी विधी वटवृक्ष मंदिरातील संपन्न होणाऱ्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आल्याने सनईच्या मंजूळ स्वर आविष्काराने अत्यंत मंगलमय प्रसन्नपूर्वक भक्तिमय वातावरणातील हा सोहळा उपस्थित भाविक याची देही याची डोळा अनुभवून धन्य झाले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, जनार्दन होळळा, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, मनोहर देगावकर, महेश घिवारे, संजय पवार, प्रसाद सोनार, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, ऋषिकेश लोणारी, स्वामीनाथ लोणारी, पवन पवार, महेश मस्कले, लखन गवळी, चन्ना विभूते, सागर गोंडाळ, चंद्रकांत कवटगी, रवी मलवे, श्रीकांत मलवे आदींसह अनेक स्वामी भक्त उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स