ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आणखी 6 महिने मोफत धान्य मिळणार असा केंद्र सरकारचा निर्णय..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आणखी 6 महिने मोफत धान्य मिळणार असा केंद्र सरकारचा निर्णय..!

प्रकाशन: 28 Mar 2022 04:18 PM
वाचन संख्या 85

चिंदर | विवेक परब :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (पीएम-जीकेएवाय) आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशातील 80 कोटी गरीब जनतेला या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.

कोरोनाची लाट नियंत्रणात येत असली, तरी भारतात सर्व आर्थिक व्यवहार हळूहळू सुरू होत आहेत. यादरम्यान काही नागरिकांची परिस्थिती खालावली तर कोणाच्या हातातील काम गेल्याने हातात पैसा राहिला नाही. गरीब लोकांच्या नशिबी आणखी गरिबी आल्याने, आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्याच्या काळात एकही गरीब कुटुंब उपाशी राहू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना 31 मार्च रोजी संपणार होती, पण आता ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहील, असा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्डवर गरिबांना प्रतिव्यक्ती महिन्याला एकूण 5 किलो मोफत धान्य मिळत आहे. त्यामध्ये या योजनेतील नागरिकांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती दिले जाते.

कोरोना काळात गरीबांना आधार मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च http://localhost/news/public/uploads/2020 मध्ये ही योजना सुरू केली होती. पण कोरोनानंतर देशात आर्थिक परिस्थिती मात्र बिघडली दिसत आहे. आता कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असूनही गरीबांबरोबर संवेदनशीलता दाखवत या योजनेची मुदत वाढवली आहे, असे अन्नधान्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी ट्विट करत म्हणाले, “देशातील सर्व नागरिकांच्या शक्तीत भारताचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आणखी वाढवण्यासाठी सरकारने ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) आणखी 6 महिन्यांनी वाढवली आहे. केंद्र सरकारची ही योजना चालू वर्षी सप्टेंबर http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 80 कोटींहून अधिक जनतेला आधीसारखा लाभ आता घेता येईल”, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत माहीती दिली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे व गोरगरीब जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स