ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदिनांक

सिंधुदिनांक

प्रकाशन: 27 Mar 2022 09:27 AM
वाचन संख्या 55

२७ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

. १६६७ साली शिवाजी महाराजांना सोडून मोघलाईत जाणारे सेनापती नेताजी पालकर यांचे मोघलाईत गेल्यानंतर मुघल बादशाहा औरंगजेब याने त्यांचे धर्मांतर केले व त्यांचे नाव महमंद कुली खान ठेवले.

सन १६६८ साली इंग्लंड देशाचे शासक चार्ल्स द्वितीय यांनी मुंबई प्रांताला ब्रिटीश शासकांच्या इस्ट इंडिया कंपनीच्या हवाली केलंइ.स. १७९४ साली अमिरीकेतील नौदल सेनेची स्थापना करण्यात आली.

सन १८४१ साली वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची यशस्वी चाचणी सर्वप्रथम न्यूयार्क देशांत घेण्यात आली.

१८५५ साली कॅनेडियन फिजिशियन(वैद्य) अब्राहम गेस्नर यांनी केरोसीन (रॉकेल) चे नमुने शोधले.

सन १८७१ साली पहिला आंतरराष्ट्रीय रग्बी सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन राष्ट्रांच्या संघादरम्यान खेळण्यात आला

.सन १९६१ साली पहिला जागतिक रंगमंच दिन साजरा करण्यात आला.

इ.स. १९६६ साली २० मार्च रविवार या दिनी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या एक कुत्र्याला सापडला, यानंतर

सन १९८३ साली हा चषक पुन्हा चोरीला गेला तो आजतागायत सापडलेला नाही.

सन १९९२ साली शहनाई वादक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकार तर्फे देण्यात येणारा तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इ.स. २००० साली भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शिक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स