आयना की बायना.... मदत दिल्याशिवाय तारकर्लीचा बाळगोपाळ जाइना..!
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : तारकर्ली गांवातील बाळगोपाळांनी प्रती वर्षां प्रमाणे या ही वर्षी समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. या बाळगोपाळांनी होळी सणादरम्यान गावात शिमगा खेळून निधी गोळा केला व या गोळा झालेल्या निधी मधील काही भाग गावातील श्री. विनायक कांदळगावकर या जेष्ठ व्यक्तीला औषधोपचारासाठी मदत स्वरुपांत दिला आहे. तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर, वेदांत सदाशिव सागवेकर , ईशान सदाशीव सागवेकर , प्रणित भार्गव कांदळगावकर, निनाद गणपत मोंडकर , रिषभ श्रीधर खराडे , आशिष जितेंद्र चव्हाण , सिद्धेश नरेश टिकम,नैतिक धोंडी कांदळगावकर, रोहित बाळकृष्ण वरक व रामचंद्र चंद्रशेखर कुबल या बाळगोपाळांनी होळी सणा दरम्यान गावात शिमगा खेळुन निधी गोळा केला. या गोळा झालेल्या निधी मधील काही भाग गावातील विनायक कांदळगावकर या जेष्ठ आणि आजारी व्यक्तीला औषधोपचारासाठी मदत म्हणुन दिला. त्यामुळे या कुटुंबावर असलेला वैद्यकीय खर्चाचा भार काही प्रमाणात हलका झाला आहे. या उपक्रमाचं हे सलग चौथ वर्ष आहे. यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील अनेक कुटुंबाना आर्थिक मदत केली होती. हे बाळगोपाळ आपल्या नकळत्या वयात सुद्धा अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)