ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिक्षणप्रसारक श्री.सत्यवान यशवंत रेडकर यांच्या एप्रिलमधल्या कोकण दौर्याची व्याख्यान केंद्रे जाहीर..!

शिक्षणप्रसारक श्री.सत्यवान यशवंत रेडकर यांच्या एप्रिलमधल्या कोकण दौर्याची व्याख्यान केंद्रे जाहीर..!

प्रकाशन: 25 Mar 2022 02:13 AM
वाचन संख्या 269

मालवण | सुयोग पंडित : ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या शैक्षणिक प्रतिष्ठानचे संस्थापक आणि शिक्षणप्रसारक सत्यवान यशवंत रेडकर यांचा चिपळूण ,गुहागर,दापोली व खेड असा कोकण दौरा जाहीर झाला आहे.

या दौर्याअंतर्गत श्री.रेडकर निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शैक्षणीक पद्धती या विषयांवर विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

गुरुवार 14 एप्रिलला सकाळी 09:30 वाजता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर काॅलेज खेर्डी,चिंचघरी सती,तालुका चिपळूण,जिल्हा रत्नागिरी आणि दुपारी 2 वाजता निर्मल ग्रामपंचायत,आंबवली,तालुका खेड,जिल्हा रत्नागिरी येथील व्याख्यान मार्गदर्शन सत्रांपासून हा दौरा सुरु होत आहे.

यानंतर 15 एप्रिलला सकाळी 9 वाजता श्री सोम नागेश्वर मंदिर,भेळेवाडी तळवली,तालुका गुहागर ,जिल्हा रत्नागिरी व दुपारी 1 वाजता न्यू इंग्लिश स्कूल,पाटपन्हाळे शृंगारतळी,तालुका गुहागर,जिल्हा रत्नागिरी येथे मार्गदर्शन केले जाणार आहे.

तिसर्या दिवशी दिनांक 16 एप्रीलरोजी सकाळी 9 वाजता पूज्य सानेगुरुजी मंदिर पालगड ,तालुका दापोली,जिल्हा रत्नागिरी आणि दुपारी 2 वाजता न.का.वराडकर कला, रा.वि.बेलोसो वाणिज्य व कै.शांतीलाल जैन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दापोली येथे व्याख्यान मार्गदर्शन केले जाणार आहे.

या दौर्याच्या अंतिम चरणामध्ये 17 एप्रिलला एल.पी.इंग्लिश स्कूल व ज्युनियर काॅलेज खेड,तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे 9 वाजता आणि दुपारी 1 वाजता समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल (सि.बी.एस.ई.) व ज्युनियर काॅलेज वेरळ,तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथील व्याख्यान मार्गदर्शन सत्राने हा दौरा संपन्न होणार आहे.

तरी वरील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी या निःशुल्क व्याख्यान सत्रांना उपस्थिती दर्शवून स्वतःच्या उज्वल शैक्षणिक भविष्यासाठी व कारकिर्दिसाठी मार्गदर्शन व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स