इन्सुली घाटीमध्ये टाका नेक्साॅन कारला आयशर ची धडक....!
बांदा | राकेश परब : सावंतवाडी बांदा रोडवर इन्सुली घाटीमध्ये आयशर कॅन्टर व टाटा नॅक्साॅन कार ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र यात कोणीही जखमी झाले नाही.
सदर घटना काल सायंकाळच्या सुमारास बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली घाटी परिसरात घडली. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
अपघातग्रस्त टाटा नॅक्साॅन कार इन्सुली येथून पुणेच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशरला टाटा कार ला जोरदार धडक बसली. यात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणीही प्रवासी जखमी झाले नाही.
सायंकाळी उशिरा बांदा पोलीस श्री कोळेकर व सिद्धेश माळकर यांनी घटनास्थळी येते अपघाताचा पंचनामा केला. व बांदा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. कँन्टर चालक मद्यप्राशन करुन कँन्टर चालवत असल्याचे प्रथम दर्शनी पोलिसांना आढळून आले. अधिक तपास बांदा पोलीस करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)