ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विलवडे येथे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

विलवडे येथे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

प्रकाशन: 18 Mar 2022 06:44 PM
वाचन संख्या 91

बांदा | राकेश परब : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं. १ प्रशालेत जागतिक महिला दिन संपन्न झाला. प्रशालेत विद्यार्थ्यांनी व पालक महिला भगिनींसाठी महिला मेळावा, किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन सत्र, पाककला,रांगोळी, मुलींसाठी मनोरंजन कार्यक्रम विविध स्पर्धेला उत्स्फुर्तपणे भाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.               

Article image

    ८ मार्च ते १२ मार्चपर्यंत शाळेत विविध स्पर्धा, गुण दर्शन कार्यक्रम  संपन्न झाले. यावेळी  दत्तक पालक योजनेतर्गत बांदा केंद्र शाळेच्या शिक्षिका सरोज नाईक यांनी ३ हजार रुपये देणगी दिली.तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम दळवी यांनी १२ हजार रुपयांची देणगी शाळा दुरुस्तीसाठी म दिली. यावेळी सरोज नाईक,कोव्हीड योध्दा मैथिली परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.डाॅ.मणेरीकर,शाळा व्यवस्थापन समिती सोनू दळवी,शिक्षिका सुप्रिया सावंत,मनोहर गवस,दिपाली गाडे,सुस्मिता मांगले, अपर्णा दळवी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स