मुणगे सावंतवाडी रस्ता कामाचा शुभारंभ..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मुणगे माणिक चौक ते सावंतवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ जी प सदस्या सौ सावी लोके यांच्या हस्ते झाला. सदर रस्ता कामासाठी जि प . सदस्य सौ सावी लोके यांच्या प्रयत्नातून 5 लाख रूपये निधी उपलब्ध झाला आहे.
भाजप नेते गोविंद सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याला निधी मिळू शकला. या वेळी गोविंद सावंत , प्रमोद सावंत , पुरुषोत्तम तेली , वसंत तेली आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)