ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले - पणजी एस टी ची फेरी सुरु करा, अन्यथा आंदोलन - भाजपाचा इशारा ; आगार व्यवस्थापनाने घेतली तत्काळ दखल.

वेंगुर्ले - पणजी एस टी ची फेरी सुरु करा, अन्यथा आंदोलन - भाजपाचा इशारा ; आगार व्यवस्थापनाने घेतली तत्काळ दखल.

प्रकाशन: 14 Mar 2022 12:46 PM
वाचन संख्या 84

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आगाराची पणजी ( गोवा ) एस.टी.ची फेरी येत्या आठ दिवसात सुरु करावी अन्यथा भाजपा वेंगुर्लेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वेंगुर्ले आगार व्यवस्थापकांना भाजपा शिष्टमंडळाने दिला.


कोवीडच्या काळापासुन अनियमित असलेली पणजी फेरी ही एस्. टी.कर्मचारी संपापासुन पुर्ण पणे बंद आहे . त्यामुळे नोकरदार वर्ग, शाळा काॅलेज मध्ये जाणारे विद्यार्थी, गोवा राज्यात जाणारे रुग्ण यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच सदर एस्. टी.चा फायदा उभादांडा – मोचेमाड -आरवली – शिरोडा – आजगाव – मळेवाड – सातार्डा येथील ग्रामीण भागातील प्रवाशांना पण होतो .त्यामुळे सर्वांचे हाल होत आहेत.


सद्यस्थीतीत एस्. टी.चे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत, त्यामुळे आता एस्. टी.ची सेवा हळुहळु सुरु झाली आहे. परंतु अजून पर्यंत भारमान देणारी पणजी फेरी सुरु करण्यात आलेली नाही, त्यामुळे एस्. टी.महामंडळाचेही नुकसान होत आहे. म्हणून येत्या आठ दिवसात ही फेरी सुरु न केल्यास भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा आगार व्यवस्थापक वारंग यांना देण्यात आला.


या निवेदनाची दखल भाजपा वेंगुर्लेच्या वतीने घेतली जाऊन आगार व्यवस्थापकांना निवेदन दिल्यावर ताबडतोब आगार व्यवस्थापकांनी वरीष्ठांशी चर्चा करुन बुधवार पासुन पणजी साठी सकाळी ६ :३० व दुपारी २ : ४५ अशा पुर्वी प्रमाणे दोन फेर्या सुरु करण्याचे अभिवचन दिले .


यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे – श्रेया मयेकर , ता.चिटनीस जयंत मोंडकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , आय. टी.सेलचे केशव नवाथे , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व रसीका मठकर , ओंकार चव्हाण , वायंगणी उपसरपंच हर्षद साळगांवकर , युवा मोर्चा चे भुषण सारंग , संतोष खानोलकर इत्यादी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स