डॉ.खानोलकर यांच्यावरील पुस्तकाचे बांद्यात रविवारी प्रकाशन
बांदा |राकेश परब : जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर व लोकप्रिय समाजसेवक स्व.डॉ. द.भि. तथा भाई खानोलकर यांचे जीवन चरित्र ”एक झाड चंदनाचे'” या प्रकाश तेंडोलकर लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ठीक ४.०० जि.प.केंद्र शाळा बांदा नंबर १ येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांद्यातील प्रसिद्ध डॉ.श्री.श्रीपाद जोशी तर
उद्घाटक म्हणून नामवंत बालरोगतज डॉ.अरविंद खानोलकर हे उपस्थित राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मंगेश कामत , माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ शशी पित्रे, प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते शंकर उर्फ भाऊ वळंजू , खेमराज प्रशालेचे निवृत्त प्राध्यापक प्रा. गणेश गर्दे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहऴ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन अभिनव दर्पण प्रतिष्ठान बांदा च्या वतीने करण्यात आले आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)