ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जागे राहून स्वप्नांचा पाठलाग करा ; देवदत्त पुजारे यांचे विध्यार्थ्यांना आवाहन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जागे राहून स्वप्नांचा पाठलाग करा ; देवदत्त पुजारे यांचे विध्यार्थ्यांना आवाहन.

प्रकाशन: 11 Mar 2022 04:43 PM
वाचन संख्या 261

मुणगे हायस्कुल येथे दहावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : आयुष्याच्या पुढील टप्यावर पुन्हा शाळेचा आनंद मिळत नाही. जीवनात सहजा सहजी काही मिळत नाही. त्यामुळे जीवनात संघर्ष करायला शिका. चांगले गुण मिळवताना चांगले माणूस बना. समाजामध्ये तुमचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे. माजी विद्यार्थी म्हणून तुमची जबाबदारी ओळखा व शाळेचे ऋण भविष्यात विसरू नका. विध्यार्थी दशेतच आयुष्याचा आराखडा तयार करा. स्वप्न जागे पणी पहा व स्वप्नांचा पाठलाग करा असे आवाहन श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी येथे केले.


मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हायस्कुलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, विजय पडवळ, जेष्ठ शिक्षिका श्रीमती एम. बी. कुंज, श्रीपाद बागवे, प्रसाद बागवे, एन. जी. वीरकर, बाबाजी सावंत, सौ. गौरी तवटे, हरीश महाले, प्रियांका कासले, सौ. प्रियांका ठाकूर, गुरुप्रसाद मांजरेकर, स्वप्नील कांदळगावकर, नामदेव बागवे, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू, संतोष मुणगेकर, तसेच शिक्षक विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर म्हणाले, निलेश परुळेकर म्हणाले, जीवनात नेहमी नम्रता बाळगा. तुमचे वेगळेपण चार चौघात उठून दिसल पाहिजे. प्रयत्नांना चांगल्या विचारांची जोड ध्या.
यावेळी विध्यार्थी तसेच शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गाला भिंतीवरील घड्याळ भेट दिले. सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत यांनी दहावीच्या सर्व विध्यार्थ्यांना परीक्षेसाठी शैक्षणिक साहित्य भेट दिले. सूत्रसंचालन व आभार सौ गौरी तवटे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स