ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार : पख़वाजवादक अमेय गावडे.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार उचलणार : पख़वाजवादक अमेय गावडे.

प्रकाशन: 11 Mar 2022 04:20 PM
वाचन संख्या 22

बांदा | राकेश परब : “शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होत आहेत. त्यात होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अर्धवट राहू नये, यासाठी पाडलोस गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ मधील दोन विद्यार्थिनींचा चौथी पर्यंत येत्या शैक्षणिक वर्षांपासूनचा केवळ शैक्षणिक खर्च करण्याचा निर्णय राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पख़वाज वादक अमेय तुकाराम गावडे यांनी केला आहे.

पाडलोस जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या वाढदिवशी मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, मुख्याध्यापक उत्कर्षा परब, शिक्षक साहेबराव शेवाळे, पत्रकार विश्वनाथ नाईक आदी उपस्थित होते.

श्री. गावडे म्हणाले की, गरिबीमुळे आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण देताना अडचणी येतात. ग्रामीण भागातील पालकांची ही अडचण लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. गावातील तरुणांनी आपल्यापरीने अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करावा असे आवाहनही अमेय गावडे यांनी केले. तसेच भविष्यात आपण फावल्यावेळी विद्यार्थ्यांना पखवाज वादनाबरोबर अभ्यास करणे कसा सोपा होतो यासाठी मोफत प्रशिक्षण देणार असल्याची ग्वाही संगीत विशारद श्री. गावडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक उत्कर्षा परब यांनी तर आभार शिक्षक साहेबराव शेवाळे यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स